वाहतूकीचे नियम पाळा… नाहीतर दहा पट दंड भरावा लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। सातारा । आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे.

कारण नवीन मोटार वाहन दंड 2025, 1 मार्च 2025 पासून लागू झाला आहे. दंडाव्यतिरिक्त, तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे. गुन्हा व दंडाची रक्कम पुढील प्रमाणे.

सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम – एक हजार रुपये, ट्रिपल सीट प्रवास करणे – नवीन दंडाची रक्कम – एक हजार रुपये, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम – एक हजार रुपये किंवा 3 महिने लायसन्स जप्त, विमा नसलेले वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम- पहिल्यांदा 2000 रुपये, दुसर्‍यांदा चार हजार रुपये किंवा 3 महिने तुरुंगवास, धोकादायकपणे वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम- पाच हजार रुपये, अतिवेगाने वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम- पाच हजार रुपये, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन – नवीन दंडाची रक्कम- पाच हजार रुपये, वाहन चालवताना मोबाईल वापरणे – नवीन दंडाची रक्कम – पाच हजार रुपये, ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम- पाच हजार रुपये, आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंडाची रक्कम – दहा हजार रुपये, पीयुसीशिवाय वाहन चालविणे- नवीन दंडाची रक्कम- दहा हजार रुपये किंवा सहा महिने तुरुंगवास, दारु पिऊन वाहन चालविणे – नवीन दंडाची रक्कम- दहा हजार रुपये किंवा सहा महिने तुरुंगवास, ओव्हरलोडिंग – नवीन दंडाची रक्कम- 20 हजार रुपये, अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे – 25 हजार रुपये किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास, 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द, अशा स्वरुपाचे दंड आकारणी करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!