फलटण शहरात वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा; पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण शहरात बेदरकारपणे व वेगाने वाहन चालविने, ट्रिपल सीट प्रवास करने व ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह करणार्यांविरुध्द कारवाईची मोहिम सुरु करण्यात आली आहे. वाहतूकीचे नियम पाळा अन्यथा कारवाईस सामोरे जा असा इशारा फलटण शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड यांनी दिला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या सुचनेनुसार व पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

सध्या दहिहंडी व अगामी काळात गणेशोत्सव असल्याने या कालावधीत विविध कारणांनी वाहतूकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी फलटण शहरात विविध मार्गांवर गाड्या वेगाने चालविणे, विना परवाना अथवा ट्रिपल सिट चालविने, दारु पिवून गाडी चालविणारांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रवास करताना वाहतूकीचे सर्व नियम पाळले जातील याची काळजी वाहन चालकांनी घेणे आवश्यक आहे. जे वाहनचालक नियम पाळणार नाहीत अशांविरुध्द फलटण शहर पोलिस वाहतूक शाखेच्यावतीने कारवाईची ही मोहिम हाती घेण्यात आली असल्याचेही दीपाली गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!