फुलला सुगन्ध मातीचा, बाळू मामा,फेम,अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी भेटवस्तू प्रदान करून वाढदिवस केला साजरा


दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । भाई शिंगरे ट्रस्ट मालाड, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता केवळ सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने सिद्धी कामथ यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त तेथील कामगार आणि गरजू व्यक्तींना भेटवस्तू म्हणुन थर्मासचे वाटप केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंदनभाई शिंगरे, सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे, निर्माते सचिन पाताडे, विनायक कामथ आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचाच एक भाग म्हणुन त्याच दिवशी रात्रौ रविन्द्रनाथ नाटय मंदिर, प्रभादेवी येथे मुंबई एकी समूहा तर्फे देखिल सिद्धी यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर आणि इतर कलावंत उपस्थित होते. हा वाढदिवस सोहळा यशस्वी करण्यासाठी मनिष मेहेर, पल्लवी पाटील आणि गणेश तळेकर यांचे विशेष योगदान लाभले.


Back to top button
Don`t copy text!