स्थैर्य, सातारा, दि. 29 : फुलाचा व्यवसाय फुलासारखा फुलला तर फुलतो नाही तर फुलासारखा कोमेजतो असे म्हटले जाते. त्यानुसार सातारा शहरात गजरा विक्री करणाऱ्यांचे तर गेल्या तीन महिन्यात बेहाल झाले. यात्रा, जत्राचा यावर्षीचा हंगाम त्यांना घेता आला नाही. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच वट पौर्णिमेला शहरात गजरेवाल्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. परंतु अजून एवढी लोक बाहेर पडत नसल्याने आणलेला फुलांचा माल तसाच राहत आहे.
फुलांचे गजऱ्यांचे पार्सल हे एसटीने फलटण, बारामती येथुन यापूर्वी येत होते. परंतु आता फुलविक्री करणाऱ्यांना शेतातून फुले आणून गजरे बनवून विक्री करावी लागते आहे. पुन्हा विक्री होत नसल्याने फुल विक्री करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत.