
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। निंबळक । 12 वर्षापूवी तातमगिरी डोंगर पायथ्याला ढगफुटी झाली होती त्याचा फटका अनेक गावांना बसला होता तसाच फटका निंबळक गावाला सुध्दा बसला होता. राज्यातील प्रसिध्द बांधकाम उद्योजक राम निंबाळकर यांनी तेव्हा पासुन दरवर्षी ओढ्याच्या परीसरात असलेली काटेरी झुडपे काढून, ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले असल्यानेच पाण्याला योग्य आऊटलेट मिळाल्यामुळेच निंबळकला यंदाची पुरपस्थिती नियंत्रणात राहुन नुकसान झाले नसल्याचे दिसुन येत आहे.
फलटण तालुक्यात गेली 15 वर्षात कधी नव्हे एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसेल तेवढा पाऊस गेल्या सात दिवसात पडला असल्याने तालुक्यात पुरजन्य परिस्थिती उदभवली आहे. याचा फटका अनेक गावांना बसला आहे. निंबळक गावच्या पूर्व, पश्चिम दक्षिण बाजुस ओढे व उत्तरेला निरा उजवा कालवा आहे.
या ओढ्यांना तातमगिरी डोंगरापासुन पाण्याचा प्रवाह येत असल्याने साहजिकच या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पुर येत असतो.
या पुरपरिस्थिचा सारासार विचार करुन निश्चितच राम निंबाळकर साहेब यांनी दुरदृष्ठी ठेवुनच ओढे रुंदीकरण व खोलीकरण केल्यानेच निंबळकची पुरपरिस्थिती नियंत्रणात आहे.