फ्लिपकार्ट आणि गिव्ह इंडिया टीमने आरोग्य विभागाला दिले २८ व्हेंटिलेटर्स; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार


स्थैर्य, मुंबई, दि.०१: फ्लिपकार्ट आणि गिव्ह इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला 28 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती, श्री. रजनीशकुमार यांचे आभार मानले असून  तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना याची नक्की मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

यासंबंधीचे आभार पत्र  मुख्यमंत्र्यांनी डिप्पी वांकाणी, संचालक फ्लिपकार्ट यांना दिले त्यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!