
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : सातार्याच्या विकासाचे ध्येय उराशीबाळगलेल्या नगराध्यक्षपदाच्या 21 पैकी 10 ते 12 इच्छुकांनी 50 लाखांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत स्वतःचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे नगराध्यक्षपदासाठीचा होणारा खर्च कोटींची उड्डाणे घेणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी 15 लाख खर्चाची मर्यादा आहे.त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे का? याची चाचपणी करण्यात आली. पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष ठसेच नगरसेवकपदाराठी भाजपकडून सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीदरम्यान इच्छुकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेसह त्यांच्याकडून समाजकारण, राजकारण याची माहिती घेतली जात होती, तसेचनगराध्यक्षपदाच्या प्रश्नावलीमधील खर्च करण्याच्या प्रश्नावर अनुभवी पदाधिकार्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उत्तरे दिली. ज्यांना काही करून हे पद हवेच आहे, त्यांनी मात्र आकडे पुरावल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी नगराध्यक्ष भूषविलेल्यांपैकी काही जणांनी दोन कोटींपासून 50 लाखरुपये वैयक्तिक खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. याबरोबरच जे यापूर्वी उपाध्यक्ष होते, त्यातील काहींनी उत्तर देण्याचे टाळल्याचे समजते. काहींनी एक नगराध्यक्षपदासाठी साधारणतः किती रुपये खर्च येईल, असे एका माजी नगराध्यक्षांकडून जाणून घेतले असता त्यांनी सातार्यातील राजकीय परिस्थिती सांगत सुमारे 75 लाख रुपये पुरेसे आहेत, असे नमूद केले.
दरम्यान, थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने त्यांना शहर व उपनगरांमध्ये प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी 25 प्रभागांतील उमेदवारांबरोबरच जावे लागणार आहे. प्रचाराचा अवधी कमी असल्याने ते शक्य होईलच असे नाही. त्यामुळे संबंधित प्रभागातील पक्षाच्या उमेदवारावर बरेचसे अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, 25 प्रभागांतील उमेदवारांना पक्षाकडून अथवा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडून काही रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे खर्चात वाढू होऊ शकते, असे एकाने सांगितले.
नवख्यांनी समाजकारणातकरीत असलेल्या खर्चाची माहिती देत राजकीय क्षेत्रात उतरणार असल्याने मोठ्या खर्चाची तयारी दर्शवली आहे. याबरोबरच नवख्यापैकी काहींनी तीन कोटींपासून दहा कोटींपर्यंत खर्च करण्याची तयारी ठेवली आहे.
