दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । वावरहिरे । आपल्या देशाला स्वतंञ्य मिळुन ७५ वर्षे पुर्ण होत असल्याने संपुर्ण देशात स्वतंञ्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं १३ ऑगस्ट ते १५ऑगस्ट या कालावधीत स्वतंञ्यांचा अमृतमहोत्सवात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ साठी अवाहन केले. वावरहिरे ता.(माण) व पंचक्रोशीतील नागरिकांनीही याला चांगला प्रतिसाद देत प्रत्येकांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवत ‘ आझादी का अमृतमहोत्सव’ यात सहभाग नोंदवला. तर स्वतंञ्यदिनी गावातील श्री पाणलिंग विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा,मागारवर्गीय मुलांचे वसतिगृह, जिल्हा बॅक,ग्रामपंचायत कार्यालय,विकाससेवा सोसायटी,आरोग्य उपकेंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढत ‘वंन्दे मातरम,’ ‘भारत माता की जय’, ‘स्वातंञ्य दिनाचा विजय असो या घोषनासह ‘स्वतंञ्यांच्या अमृतमहोत्सवाचा जयघोष करत ठिकठिकाणी ध्वजवंदन केले. गावातील देशसेवेसाठी कार्यरत असणार्या व देशसेवा पुर्ण केलेल्या आजी माजी सैनिकांच्या हस्ते गावातील विविध ठिकाणी ध्वजारोहण करुन त्यांच्या कार्याचा व देशसेवेचा सन्मान करत सरपंच चंद्रकांत वाघ व ग्रामस्थांनी त्यांचा गौरव केला. ग्रामपंचायत येथे अभिषेक वाघ आणि अभिजित गोसावी या जवानांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विकाससेवा सोसायटीचा ध्वजारोहण श्री पाणलिंग विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये ९२.४४%गुण मिळवत प्रथम आलेल्या चि. अर्थव सुरेश कासार याच्या हस्ते करण्यात आला. पशुवैद्यकिय दवाखाना येथे सरपंच चंद्रकांत वाघ, जि.प.शाळा येथे उत्तम अवघडे, श्री पाणलिंग विद्यालय येथे हणमंत पांढरे,मागरवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे जगन्नाथ जाधव , जिल्हा मध्यवती बॅक येथे दादासो खुस्पे,प्राथमिक आरोग्य उपकेॅद्र येथे राजु मुळे,पोस्ट आॅफिस येथे ताई पांढरे आदींनी ध्वजारोहण केले. श्री पाणलिंग विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुणंवत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत व ग्रामस्थायांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती .यावेळी सरपंच चंद्रकात वाघ,हणमंत पांढरे,माजी सरपंच बाबासो हुलगे, चेअरमन विश्वास पांढरे,भगवान गुळीक,संदिप अवघडे,मल्हारी जाधव,तुलशीराम यादव यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२६जानेवारी असो वा १५ ऑगस्ट अशा प्रसंगी गावपातळीवर सर्वसाधारणपणे राजकीय व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे परंतु याला तिलाजंली देत गावातील देशसेवेसाठी खर्या अर्थांने भारत मातेचे वारसदार असणारे व राञीला दिवस समजुन देशाची मनोभावे सेवा बजावणार्या गावातील जवानांना देशाचा तिरंगा फडकविण्याचा मान द्यायला हवा, तो त्यांच्यासाठी सर्वात मोठा बहुमान आहे. म्हणुन आम्ही गावात आजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.