दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । लोणंद । नगरपंचायतवर लोणंद येथील शहिद जवान संतोष ठोंबरे यांच्या वीरपत्नी ठकुबाई संतोष ठोंबरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकवण्यात आला.
लोणंद नगरपंचायत येथे २६ जानेवारी हा ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस नगरपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा ध्वज राजकीय नेत्यांकडून फडकणार नाही हे आधीच निश्चित होते. मात्र, ऐनवेळेस प्रशासक संजय गायकवाड हे कोरोनाबाधीत आढळल्याने शहिद जवान पत्नी ठकुबाई संतोष ठोंबरे यांच्या हस्ते ध्वज फडकावण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. यावेळेस नगरपंचायतीच्या वतीने शहीद जवान संतोष ठोंबरे यांच्या पत्नी ठकुबाई ठोंबरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास वीरपत्नी ठकुबाई संतोष ठोंबरे यांच्यासह नगराध्यक्ष सचिन शेळके, नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजीराव शंकरराव शेळके, दिपाली संदिप शेळके, दिपाली निलेश शेळके , राजश्री रविंद्र शेळके, तृप्ती घाडगे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, कार्यालयीन अधीक्षक शंकरराव शेळके, बाळासाहेब भिसे, पोपटराव क्षीरसागर, रोहित निंबाळकर, विजय बनकर आदी कर्मचारी उपस्थीत होते.