
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त, श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर येथे जैन सोशल ग्रुप, फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. जैन सोशल ग्रुपच्या सचिव सौ. निना कोठारी, खजिनदार राजेश शहा आणि माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी हे देखील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बेडके, सर्व शिक्षक वृंद, तसेच जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी हर्षद गांधी आणि सौ. अपर्णा जैन उपस्थित होते.