राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाच शाळांची निवड


स्थैर्य, सातारा, दि. 3 डिसेंबर : राज्यस्तरीयइन्स्पायर अवॉर्ड (मानक) प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील पाच शाळांच्या वैज्ञानिक उपकरणांची निवड थेट राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी झाली आहे. यामध्ये सैनिक स्कूल, साधना इंग्लिश स्कूल (सातारा), भारत विद्यालय (शहाबाग, वाई), जिल्हा परिषद शाळा (भोसे), लाहोटी कन्या शाळा (कर्‍हाड) या शाळांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनीआपल्या कल्पकतेच्या आणि वैज्ञानिक दृष्टि को नाच्या जोरावर महाराष्ट्रातून आपले स्थान राष्ट्रीय पातळीवर निश्चित केले आहे. या प्रेरणादायी कामगिरीसाठी जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांना व विद्यार्थ्यांना धनंजय चोपडे, तेजस गमरे आणि विस्तार अधिकारी दत्ता गिरी व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्पायर अवॉर्ड नॉमिनेशनच्या वेळी जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे, उपसमन्वयक श्रीकांत कुंभार यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!