
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील पाच प्रमुख योजनाबाह्य रस्त्यांना ‘ग्रामीण मार्ग’ म्हणून दर्जा देण्यात आला असून, यामुळे या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जेदार विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे रस्ते विकास योजनेअंतर्गत या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
या निर्णयामुळे या रस्त्यांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार असून, त्यांची कामे अधिक दर्जेदार होतील, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. याकामी आमदार सचिन कांबळे-पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि विलासराव नलवडे यांनीही विशेष पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही नाईक निंबाळकर म्हणाले.
‘ग्रामीण मार्ग’ म्हणून दर्जा मिळालेले रस्ते पुढीलप्रमाणे:
1. राजाळे गाव (फलटण-आसू रस्ता) छ २६ चारी, टेंगील वस्ती ते अनपट वस्ती रस्ता (लांबी – २.०० किमी)
2. राजाळे गाव अंतर्गत आसू रोड ते पिंपरद रस्ता (लांबी – ४.०० किमी)
3. राजाळे जाधव वस्ती (शिवाजी नगर) ते सोनगाव रस्ता (लांबी – १.०० किमी)
4. आळजापूर ते पवार वस्ती, मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती रस्ता (लांबी – ३.५० किमी)
5. आळजापूर ते शिंदे वस्ती (धनगरवाडा), बिबी रस्ता (लांबी – २.५० किमी)