सरड्यात दात तोडून जखमी केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । फलटण । आमच्या घराकडे व माणसांकडे बघतो या कारणावरून सरडे, ता. फलटण येथील एक जणास दात तोडून जखमी केल्या प्रकरणी पाच जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सरडे येथे विजय भानुदास धायगुडे, वय ३८, रा. धायगुडे वस्ती, सरडे यांना सुखदेव भंडलकर यांच्या घरासमोर आदेश सुखदेव जाधव, विक्रम लालासो जाधव, मुन्ना जयसिंग भंडलकर, सुधीर लालासो जाधव व कृष्णा रामचंद्र चव्हाण, सर्व रा. सरडे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून धायगुडे व त्यांच्या भावास मारहाण केली. सदर मारहाणीत धायगुडे यांचा एक दात मोडला आहे. या प्रकरणी वरील पाच जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ए. एन. टिळेकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!