दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटणनजीक पाच पांडव आश्रमशाळा येथे संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुपअंतर्गत संगिनी फोरम फलटणच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध परिक्षेत तसेच खेळात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सौ. अपर्णा जैन यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी मानवंदना दिली व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
संगिनी फोरमकडून यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
पाच पांडव संस्थेचे अध्यक्ष श्री. महादेव तथा नाना नाळे, उपाध्यक्ष श्री. राहुल नाळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री. विजय शिंदे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र माळी सर, संगिनी फोरमच्या माजी सचिव सौ. पौर्णिमा शहा, संचालिका सौ. सारिका दोशी, सदस्या सौ. जयश्री उपाध्ये, सौ. संध्या महाजन, सौ. नेहा दोशी, सौ. अलका पाटील, सौ. नीलम डुडुं, पाच पांडव संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री. शिंदे सर यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.