फ्रान्सकडून भारताला आणखी ५ राफेल विमाने, ऑक्टोबरमध्ये हवाई दलात दाखल होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२८: फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांची आणखी एक तुकडी भारताकडे सोपवली आहे. या तुकडीतील ५ लढाऊ विमाने सध्या फ्रान्समध्येच आहेत. ही राफेल विमाने ऑक्टोबरमध्ये भारतात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. या विमानांना पश्चिम बंगालमधील कलईकुंडा हवाई दलाच्या तळावर तैनात केले जाणार आहे. ही विमाने चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचे संरक्षण करतील. राफेलच्या पहिल्या तुकडीतील ५ विमानं १० सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमात भारतीय हवाई दलात दाखल झाली आहेत.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी ही माहिती दिली. राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताला सोपवण्यात आली आहे. ही विमाने सध्या फ्रान्समध्ये आहेत. ही विमाने भारतात कधी आणायची ते आता भारतीय हवाई दलावर अवलंबून आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट हे उत्कृष्ट आहेत, असे ते म्हणाले.

भारत-चीनमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या विमानात भारताने आपल्या दृष्टीने काही बदल केले आहेत. यामुळे हे विमान कमी तापमानातसुद्धा सहजपणे ते सुरू होऊ शकते. पहिल्या तुकडीत भारतात दाखल झालेल्या ५ राफेल विमानांची २५० तासांहून अधिक उड्डाणं आणि फिल्ड फायरिंगच्या चाचण्या घेण्यात आल्या. अंबाला येथील १७ गोल्डन अ‍ॅरो पथकांमध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला आहे.

चीनच्या चेंगडू जे -२० आणि पाकिस्तानच्या जेएफ -१७ लढाऊ विमानांची तुलना भारताच्या राफेलशी होते. पण ही दोन्ही विमानं राफेलच्या तुलनेत काहीशी मागे आहेत. चिनी जे -२० विमान रोल स्टील्थ फायटर आहे. तर राफेल विमानांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. जे -२० ची बेसिक रेंज १,२०० किमी आहे. जी २,७०० किमी पर्यंत वाढवली जाऊ शकते. जे -२० ची लांबी २०.३ मीटर ते २०.५ मीटर पर्यंत आहे. त्याची उंची ४.४५ मीटर आणि पंखांची लांबी १२.८८-१३.५० मीटर दरम्यान आहे. अर्थात ती राफेलपेक्षा खूपच मोठी आहे. चीनने पाकिस्तानच्या जेएफ -१७ मध्ये पीएफ -१५ क्षेपणास्त्रांची जोडली आहेत. पण तरी ती राफेलपेक्षा कमकुवत आहे.

फ्रान्सबरोबर भारताने ३६ राफेल विमानं खरेदीचा करार केला आहे. ३६ पैकी ३० विमानं लढाऊ असतील. तर ६ प्रशिक्षण विमानं असतील. प्रशिक्षण विमानात दोन सीट असतील आणि त्यामध्ये लढाऊ विमानांमध्ये असलेली जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये असतील. रशियाकडून सुखोई विमानं खरेदी केल्यानंतर जवळपास २३ वर्षांनी भारताने प्रथमच राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. ही रफेल विमानं प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. राफेल विमानांवर मिटीओर, मिका आणि स्काल्प ही क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!