चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । मुंबई । चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.


Back to top button
Don`t copy text!