जादूटोणाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । मुलांवर जादू टोणा केला. याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब कादर अली, शमशुद्दीन मेहबूब अली, शमशुद्दीन कादर अली, मुमताज मेहबूब अली, फातिमा सरफराज पठाण सर्व रा. मिरज, जि. सांगली अशी त्यांची नावे आहेत.

सरफराज खलिल पठाण वय ४२, रा. समर्थनगर रहिमतपूर यांनी याबाबत न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. त्याच्या तपासामध्ये जबाब नोंदवून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संशयीत हे सरफराज यांची पत्नी व सासरचे लोक आहेत. ते मुलांवर जादू टोणा करत असल्याबाबत सरफराज यांनी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाअधिकारी एम. डी. ननवरे यांनी दिल्यानंतर शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मछले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!