विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । सातारा । चहा करता येत नाही, तू लवकर उठत नाहीस असे हिणावत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ नोव्हेंबर २०१५ ते २८ डिसेंबर २०२१ पर्यंत जयश्री विश्वासराव देशमुख, विश्वासराव बाबासो देशमुख, शितल सचिन पाटील, सुरज विश्वासराव देशमुख, सध्या रा. सुयश बंगला, अंकुर हॉस्पिटल शेजारी, देगाव फाटा, सातारा यांनी अश्विनी सुरज देशमुख, वय ३० या विवाहितेला तुला चहा करता येत नाही, तू लवकर उठत नाहीस, तुला तुझ्या वडिलांनी काही शिकवले आहे की नाही असे बोलुन तुला घरी परत यायचे असेल तर एक कोटी रुपये घेऊन ये असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!