वाई एमआयडीसीत चोरी करणारे पाचजण गजाआड; वाई पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । वाई । वाई येथील एमआयडीसीमधील साईपर्ण या कंपनीत चोरट्यांनी तब्बल 6 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल होताच अवघ्या बारा तासात पाच संशयितांना गजाआड करण्यात वाई पोलिसांना यश आले. वर्षा किशोर जाधव (वय 29), उमा रवींद्र जाधव (वय30), ज्योती प्रकाश जाधव (वय 28, तिघे रा. लाखानगर वाई), प्रकाश भीमा मोकलजी (वय 29), सचिन विलास सपोनिशी (वय25, रा. काशीकापडी झोपडपट्टी वाई) अशी त्यांची नावे आहेत.

वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार वाई येथील एमआयडीसीमधील साईपर्ण या कंपनीत मार्च 2020 ते दि. 15 जुलै 2021च्या दरम्यान चोरट्यांनी कंपनीमध्ये वॉल कंपाऊंडवरून व उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी, स्विच, पीव्हीसी पाईप व इतर साहित्य असा सुमारे 6 लाख 8500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शीतल जाणवे खराडे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणं शाखेचे कर्मचारी वाई, एमआयडीसी, बोर्पडी परिसरात गस्त वाढवून व खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता चोरलेल्या मालासह तीन महिला व दोन पुरुष यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि.20पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या चोरट्याकडून कंपनीतुन चोरून विकलेला माल व एक टेंपो हस्तगत केला आहे.
आणखी एका गुन्ह्याची कबुली

या चोरट्यामधील सचिन याने दहा दिवसांपूर्वी सावंत स्टोन क्रेशरमधील मोटर चोरून विकल्याची कबुली दिली. तीही मोटर हस्तगत केली असून तो मोटर चोरण्यात माहीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, स.पो.फौ.विजय शिर्के, पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, गोळे, महिला पोलीस नाईक सोनाली माने, म.पो.कॉ. शीतल साळुंखे यांनी सहभाग घेतला. याचा तपास स.पो.फौ.विजय शिर्के हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!