‘आरसा’ लघुपटाच्या चित्रीकरणप्रसंगी डावीकडून लेखक आशिष निनगुरकर,निर्माती किरण निनगुरकर,सहनिर्माते आशा कुंदप,अशोक कुंदप,अभिनेते संकेत कश्यप,अभिनेत्री श्वेता पगार व निर्मिती सहाय्यक रश्मी हेडे |
‘कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये विशेष दखल
स्थैर्य, फलटण शहर, ता. ८ – सध्या लॉकडाऊनमुळे विविध फिल्म फेस्टिवल ऑनलाइन होत आहेत. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे. कॅन्सर विषयक सामाजिक प्रबोधनात्मक निर्मिती केलेल्या व सातारा येथे चित्रीकरण झालेल्या ‘आरसा’ या सामाजिक लघुपटाला तामिळनाडू येथील ‘ कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ मध्ये “सर्वोत्कृष्ट लघुपट” सहित एकूण पाच पुरस्कार मिळाले आहेत.
‘सर्वोत्कृष्ट लघुपट- आरसा’,’सर्वोत्कृष्ट लेखन- आशिष निनगुरकर’,’सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- श्वेता पगार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- गणेश मोडक’ व ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट- आरसा’ असे एकूण पाच पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत.अनेक दर्जेदार लघुपटांमधून आशिष लिखित “आरसा” या लघुपटाने परीक्षकांची विशेष पसंती मिळवली. ‘आरसा’ हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे. या लघुपटाने याअगोदर विविध फेस्टिवलमध्ये अनेक नामांकने व पुरस्कार पटकावले आहेत.तसेच या सर्व फेस्टिवलमध्ये या लघुपटाच्या स्क्रिनिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप,गीतांजली कांबळी व डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका केल्या आहेत.आशिष निनगुरकर यांनी या लघुपटाचे लेखन केले असून ‘काव्या ड्रीम मूव्हीज व सौ.किरण निनगुरकर’ यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजले जाणाऱ्या ‘ कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये “आरसा” या लघुपटाला एकूण पाच पुरस्कार मिळाल्याने विशेष कौतुक होत आहे.या लघुपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू,अभिषेक लगस, सुनील जाधव,अजित वसंत पवार यांनी काम केले आहे. या लघुपटाचे सहनिर्माते सातारा येथील अशोक कुंदप व आशा कुंदप हे आहेत.या पुरस्काराबद्दल काव्या ड्रीम मुव्हीजच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.