गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन कार्यशाळा उपक्रम प्रेरणादायी आणि पूर्णतः शेतकरी हिताला प्राधान्य देणारा : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 25 ऑगस्ट 2021| फलटण | हरित उद्योजकता ग्रामीण विकास अभियानांतर्गत क्षारपड जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा हा उपक्रम प्रेरणादायी आणि पूर्णतः शेतकरी हिताला प्राधान्य देणारा असल्याचे नमूद करीत सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संयोजकांना धन्यवाद दिले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक ३२३४ डी १ रिजन २ झोन १ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण, कृषी महाविद्यालय फलटण आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण यांचे संयुक्त सहभागाने आयोजित एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा उदघाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

यावेळी लायन्स द्वितीय उप प्रांतपाल डिस्ट्रिक ३२३४ डी १ एम. जे. एफ. लायन भोजराज नाईक निंबाळकर, पर्यावरण डीस्ट्रिक्त चेअरमन एम. जे. एफ. लायन डॉ. शेखर कोवळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यशाळेस फलटण तालुक्यातील शेतकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सुमारे ७० शेतकऱ्यांनी सहभागी होऊन माहिती घेतली.

प्रशिक्षण कार्यशाळेत सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी डॉ. प्रकाश शिनगारे यांनी क्षारपड जमिनीत गोड पाण्यातील मत्स्यसंवर्धन सद्यस्थिती व भवितव्य या विषयावर, मत्स्य विस्‍तार शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्यसंवर्धन अर्थशास्त्र, प्रकल्प अहवाल, उद्योजकता या विषयावर, सहयोगी प्राध्यापक, मत्स्य संवर्धन विभाग प्रा. डॉ. राजू तिबीले यांनी क्षारपड जमिनीतील मत्स्यसंवर्धन या विषयावर, सहयोगी प्राध्यापक मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रा. डॉ. सुहास वासावे यांनी क्षारपड पाण्यातील मत्स्यसंवर्धन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, व शासकीय योजना यावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन व नियोजन यासाठी ला. अर्जुनराव घाडगे, प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, कृषी खात्यातील सर्व मंडल कृषी अधिकारी, लायन्स झोन सेक्रेटरी योगेश प्रभुणे, ला. चंद्रकांत कदम, ला. बाळासाहेब यादव, ला. विजयकुमार लोंढे पाटील, लायन्स क्लब फलटण अध्यक्ष ला. प्रसन्न कुलकर्णी, लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. सौ. सुनिता कदम, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम अध्यक्षा ला. सौ. नीलम लोंढे पाटील, कृषी महाविद्यालय फलटणचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, लायन्स सदस्य यांचे फार मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगून त्या सर्वांना संयोजकांनी धन्यवाद दिले.


Back to top button
Don`t copy text!