पहिला जनजाती राष्ट्रिय गौरव दिन भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य । दि.१५ नोव्हेंबर 2021 । मुंबई । आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने यावर्षी पासून १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती राष्ट्रीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.  या निमित्ताने भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जनजाती राष्ट्रीय गौरव दिवस महासंमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.

सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पहिला राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी जनजाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक उईके, प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, जनजाती मोर्चाचे प्रांत संपर्क प्रमुख किशोर काळकर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण  करण्यात आले.

तसेच राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार पेठ ( जि. नाशिक)  येथे , गडचिरोली येथे खा. अशोक नेते व प्रकाश गेडाम, ठाणे येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अशोक इरनाक तर वसई येथे राष्ट्रीय सरचिटणीस खा. दिलीप सैकिया आदींची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!