दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शिवसेना राज्य ग्रंथालय सेल कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा व मंत्री हेमंत पाटील यांचा सत्कार व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होत असल्याची माहिती शिवसेना सातारा जिल्हा ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात ११,७०० शासनमान्य ग्रंथालये कार्यरत आहेत. मात्र, या ग्रंथालयांमध्ये अल्पशा मानधनावर काम करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. वाढत्या महागाईमुळे दर्जेदार ग्रंथ वाचकांना देणे अशक्य झाले आहे. ही बाब शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता मिळणार्या अनुदानात ६०% वाढ तातडीने मंजूर केली आहे.
राज्यातील ११,७०० शासनमान्य ग्रंथालय हा अजेंडा गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहेत. यांना सक्षम करण्याकरिता याकडे अधिक लक्ष देता यावे या हेतूने हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचा पहिला मेळावा येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होत आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योग मंत्री तथा माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (ग्रंथालय) उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच दीपक केसरकर (मराठी भाषा मंत्री), गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री), दादाजी भुसे (सार्वजनिक बांधकाम मंत्री), हेमंत पाटील (मंत्री), राजेश क्षीरसागर (मंत्री दर्जा), संजय मोरे (सचिव), आनंदराव पाटील (मराठवाडा संपर्क प्रमुख), डॉ. राजू वाघमारे (प्रवक्ता शिवसेना), आ. यामिनी जाधव, आ. भावना गवळी, आ. बालाजी कल्याणकर, प्रशांत पालांडे (संपर्कप्रमुख), विजय नाहटा (शिवसेना उपनेते तथा ख.अ.ड. सेवानिवृत्त अधिकारी), बाबुराव कदम कोळीकर, माजी आमदार राम पांडागळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा मेळावा ‘नंदनवन’ मुख्यमंत्री यांचा बंगला, मलबारहिल येथे बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोज दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी ऑक्टोबर २०१२ आघाडी सरकारने ग्रंथालय चळवळीच्या विकासाला स्थगिती देण्यारा निर्णय व या स्थगितीला ऑगस्ट २०२२ रोजी महामहीम राज्यपाल महोदयांनी स्थगिती उठवल्यामुळे चळवळीच्या न्याय मागण्या पदरात पाडने युती सरकारमुळे सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे लवकरच ग्रंथालयांसाठी आर्थिक मागणी मान्य करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रावसाहेब जाधव, आत्माराम सस्ते, धनजय पवार, संजय जंगम, संतोष डांगे, शेगडे नितीन भोसले मारोती, यादव हनुमंत, सुनील पवार, सुरज वेदपाठक, विश्वास निकम, प्रदीप काकडे, रंजित लेंभे, महादेव जंगम, महेश शिंदे, विनोद शिंदे, दीपक लगडे, गजानन निकम आदी पदाधिकार्यांनी केला आहे.
या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.