दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | फलटण |
चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याने प्रति टन रुपये ३१००/- उचल जाहीर केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. श्री. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ व भागिदारी सभेमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला. एफआरपीच्या सुत्रानुसार कारखान्याची एफआरपी रु. २८२२.५० इतकी असल्याने टनाला अधिकचे रु. २७७.५० जादा अदा करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.
त्यानुसार सन २०२४-२५ या गाळप हंगामामध्ये दिनांक १५.११.२०२४ ते ३०.११.२०२४ या कालावधीमध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ६३, ५९३.३८५ मे. टन उसास प्रति. मे. टन रुपये ३१००/- प्रमाणे होणारी एकूण रक्कम रु. १९,७१,३९,४९३.०० चे ऊस पेमेंट दिनांक ०७/०१/२०२५ रोजी ऊस पुरवठादार यांचे बँकखाती वर्ग करणेत आलेले आहेत.
तेव्हा ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला सर्व ऊस श्रीराम जवाहर साखर कारखान्यास गळीतास द्यावा, असे अवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी ऊस उत्पादकांना केले आहे.