दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२३ | पिंपरी चिंचवड |
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमधील ९ मार्च १९५७ रोजी स्थापना झालेली सहकारातील महाराष्ट्रातील आदर्शवत अशी ‘कामगार पतपेढी’ ही तब्बल ६७ वर्षानंतर एकत्रितरित्या काम करून विभाजन होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी वातावरणात पुढील कामकाज करण्यास सज्ज झालेली आहे. या कामगार पतपेढीचे विभाजन होऊन ‘विलो मॅथर’ आणि ‘प्लॅट एम्प्लॉईज’ या दोन संस्थांची निर्मिती झाली आहे. या ग्रीव्हज समूह कामगार पतपेढीवर गेली सलग ६ वर्षे श्री. शिवराज शिंदे हे संचालक मंडळामध्ये सचिव म्हणून काम पाहत आहेत. फलटण लोकसेवा संघ, पुणे या तालुक्याच्या संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून गेली ७ वर्ष सामाजिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी चार लिमिटेड कंपनी एकत्रितरित्या संघटित झाल्याने सहकार क्षेत्रातील दुर्मिळातील दुर्मिळ असे उदाहरण म्हणून संबोधले तरी वावगे होणार नाही. ही संस्था विलो कंपनीच्या स्थलांतरामुळे आणि त्यांच्या मागणीमुळे दोन वेगवेगळ्या नवीन संस्थांमध्ये विभागली गेली. तसे आदेश श्री. नागनाथ कंजारी, उपनिबंधक, पुणे शहर ३ यांनी दि. १७ /०७/२०२३ च्या आदेशान्वये दिलेले होते. त्याकरिता मुख्य प्रवर्तक म्हणून श्री. शिवराज शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसे पत्र उपनिबंधक कार्यालयाने दिले आहे. ते सर्व कामकाज शिवराज शिंदे यांनी पाहिले. दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी दोन्ही नवीन संस्थांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रिमियम ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीचे सीईओ श्री. राघवेंद्र किनीसाहेब, ग्रुप सीएचआरओ निशाजी सकारियामॅडम, महेश रंगोली साहेब (प्लांट हेड), श्री. सूरज कटोच साहेब (प्लांट एचआर) तसेच ग्रीव्हज कंपनीचे श्री. अविनाश शिनकर (जनरल मॅनेजर) आणि त्यांचे सहकारी व सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी श्री. नितिन आकोटकर, श्री. रवींद्र घाडगे आणि प्रिमियम ट्रान्समिशन लिमिटेड, ग्रीव्ह्ज लिमिटेड, विलो लिमिटेड तसेच फोसेको लिमिटेड या चारही कंपनीतील संस्थांचे सर्व सभासद उपस्थित राहून अतिशय आनंदी वातावरणात पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
यावेळी श्री. किनी साहेब तसेच निशाजी सकारिया मॅडम यांनी संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची सर्व सभासदांना हमी दिली आणि संस्था हिताबरोबर सभासदहित जोपासावे, अशीही सूचना केली. यावेळी विषय पत्रिकेनुसार सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. उपस्थित असणार्या प्रमुख अतिथी यांचे मुख्य प्रवर्तक म्हणून श्री. शिवराज शिंदे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. यासाठी नवीन ११ जणांचे नवनियुक्त संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आणि पहिली सर्वसाधारण सभा ही संपन्न झाली.
सभेसाठी लेखा परीक्षक म्हणून श्री. किशोर जाधव यांचे मार्गदर्शन झाले. याचवेळी सहकार भारतीचे कोषाध्यक्ष श्री. औदुंबर नाईक यांनी सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेचा ताळेबंद संस्थेच्या व्यवस्थापक सौ. तोडकर मॅडम यांनी वाचन केला आणि सर्व उपस्थितांचे आभार श्री. जयंत हर्षे (डीजीएम एचआर अँड आयआर) यांनी मानले.