फिरोज आतार यांचा शुक्रवार पेठ तालमीचा राजीनामा; WhatsApp स्टेटस द्वारे दिली माहिती


दैनिक स्थैर्य । दि. 25 एप्रिल 2025 । फलटण | शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक फिरोज आतार यांनी शुक्रवार पेठ तालीम मंडळाचा राजीनामा दिला असल्याची माहिती WhatsApp स्टेटस द्वारे दिली आहे.

याबाबत नक्की अचानक राजीनामा का दिला ? याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही.

फिरोज आतार हे शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या आहेत. त्याची राजकीय किंमत सुद्धा फिरोज आतार यांना मोजावी लागली आहे.

पूर्वी राजे गटामध्ये कार्यरत असणारे फिरोज आतार हे गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत. राजे गटातून बाहेर पडून फिरोज आतार यांनी भारतीय जनता पार्टीत फिरोज आतार हे सक्रिय कामकाज करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!