
स्थैर्य, सातारा, दि. 20 डिसेंबर : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील कुंपणाची जाळी दीड दोन वर्षांपूर्वी काढली गेली. दरम्यान विघ्नसंतोषी लोकांकडून पठारावर वनव्याचा धोका निर्माण होणार नाही यासाठी वन विभाग व कार्यकारी समिती कायम सतर्क आहे.वणवा लागल्यामुळे वनसंपदा नष्ट होऊ शकते यावर उपाययोजना म्हणून कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने सातारा कास रस्त्यालगत जाळपट्टा काढण्याचे काम पूर्ण केले आहे.
समाजकंटकाकडून वणवा लावण्याचे प्रकार होतात त्याला आळा बसणार आहे. कास पठारावर जवळजवळ एक दीड किलोमीटरचा रस्ता सातारा कास रस्ता असल्याने या ठिकाणी कास बोटिंग, बामणोली परिसरात येणार्या विघ्नसंतोषी लोकांकडून वणवे लावण्याचा प्रयत्न सुरू असतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी सातारा कास रस्त्यालगत जाळपट्टा काढल्यानंतर वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कास पठार कार्यकारी वन समिती आणि सातारा वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जाळपट्टा काढण्यात आला असून त्यामुळे वणवा लावणार्या प्रवृत्तींना आळा बसणार आहे.
यावेळी कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल असून या हॉटेलचा कचरा जंगल क्षेत्रात टाकण्याचे प्रमाण वाढले असून यावर प्रतिबंध आणण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांना वनविभाग सातारा परिमंडळ रोहोट यांच्यावतीने नोटीस दिली असून जंगल क्षेत्रात कचरा टाकल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रोहोट परिमंडळाचे वनपाल राजाराम काशीद यांनी दिला आहे. कास पठार परिसरात जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यवसाय त्यांच्याकडील प्लास्टिक कचरा व इतर कचरा जंगलात आणून टाकून देतात. यामुळे जंगली प्राण्यांच्या अन्नसाखळीत बाधा निर्माण होऊ शकते.
विघ्नसंतुष्टांकडुन वणवा लावण्याचा प्रयत्न
हुल्लडबाज, अविवेकी तसेच विघ्नसंतुष्टांकडून या भगात बर्याचदा वणवा लावण्याचा प्रयत्न केला जातो. वनवा लावणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे. दरम्यान वणवा लागू नये यासाठी कास पठारावर त्याला पट्टा काढण्याचे काम पूर्ण केले आहे
राजाराम काशीद ,वनपाल रोहोट
