दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२२ । सातारा । ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकाला वाहतूक पोलिसाने थांबवून त्याच्याकडे दंडाच्या रकमेची मागणी केल्याने वैतागलेल्या युवकाने अंगावर डिझेल ओतून घेतल्याने एकच खळबळ उडाली हा प्रकार सातारा बस स्थानक परिसरामध्ये दुपारी अडीचच्या दरम्यान घडला आहे आहे पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले.
याबाबतची अधिक माहिती अशी वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे हे सातारा बस स्थानका शेजारील सेव्हन स्टार इमारतीसमोर वाहनांची तपासणी करत होते यावेळी एक दिवस दुचाकीवरुन ट्रिपल सीट आला त्याला अडविल्यानंतर हवालदार शिंदे यांनी त्याला लायसन मागितले मात्र त्याच्याकडे लायसन नव्हते त्यामुळे शिंदे यांनी त्याला विनापरवाना गाडी चालवली व ट्रिपल सीट होता म्हणून एक हजार आणि गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे पाचशे तसेच मोठा होऊन लावल्यामुळे शंभर असा जवळपास साडेसात हजार रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले.
यावरून संबंधित दुचाकीस्वाराने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला सरतेशेवटी हवालदार शिंदे यांनी त्याला कमीत कमी एक हजार रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले याचा राग आल्याने तो पळतच भूविकास बँकेचे जवळील असलेला पेट्रोल पंपावर गेला व तेथून त्यांमधून डिझेल घेऊन परत ते त्याला शिंदे यांच्यासमोर त्यांनी डिझेल अंगावर ओतले आणि पेटवणे आधीच त्याला नागरिकांनी पकडले आणि पुढे मोठा अनर्थ टळला या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन त्याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे द्र दुचाकीस्वारांची नाव समजू शकले नाही.