
दैनिक स्थैर्य । 9 एप्रिल 2025। सातारा । राज्यातील पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सुरळीत मिळावा आणि अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेवु नयेत म्हणुन दिनांक १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत महाराष्ट्र शासणाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या परिसरातील प्राधिकृत रास्तभाव दुकानांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करुन या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
या मोहिमेतंर्गत सातारा जिल्ह्यात दुबार, स्थलांतरीत, मयत लाभार्थी वगळण्यासाठी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या वास्तव्याचा ठिकाणाचा आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा पुरावा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी भाडेपावती, निवासस्थानाचा मालकिचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, वीज देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, बँक, पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड किवा कार्यालयीन इतर ओळखपत्र या पैकी किमान एका कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे.
सादर करण्यात आलेला पुरावा १ वर्षापेक्षा जास्त जुना नसावा.