
दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी वित्तीय जाणीव जागृती अभियान राबविले. या अभियानाअंतर्गत 1 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या कालावधीत फलटण शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन खर्या व खोट्या चलनी नोटा ओळखण्यासंदर्भात जनजागृती केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेल्या ज्ञानाचा लाभ समाजातील विविध घटकांना व्हावा या भूमिकेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
विद्याथ्यार्र्नी स्वत:च्या कुटूंबापासून सुरुवात केली. व परिसरातील सामान्य जनता, छोटे व्यावसायिक, व्यापारी, अशिक्षित व अल्पशिक्षित नागरिकांना माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले.
रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी साधारणपणे 3 लाख बोगस नोटा सापडतात. बोगस नोटांची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य जनतेला खर्या व खोट्या नोटा कशा ओळखाव्यात याबाबत पुरेशी जाण नसल्यामुळे अशा नोटा सर्क्युलेशन मध्ये राहत असल्याचे दिसून येते. या नोटांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम, प्रो. डॉ.टी.पी.शिंदे, प्रा. जे.पी. बोराटे, प्रा. डॉ. ए. एस. जाधव, प्रा. एल.सी. वेळेकर, प्रा. पी. एच. शेट्टये, प्रा. डॉ. एस. जी. निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या जनजागृती कार्यक्रमाचे कामकाज प्रा. विशाल गायकवाड यांनी पाहिले.