
दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। बारामती । इयत्ता दहावी मध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन सन्मान करणार असल्याचे ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार इयत्ता 10 वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्रावणी संतोष पवार हिला 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या किशोर घोरपडे 20 हजार रुपये, तृतीय क्रमाक मिळविलेल्या सिद्धी प्रकाश शिंदे 10 हजार रुपये तसेच तनुजा जनार्दन आटोले हिला 10 हजार रुपये, श्रवण नरेंद्र गोफणे 10 हजार रुपये, श्रेया नितीन कांबळे 10 हजार रुपये, दिग्विजय दिपक तिवाटणे 5 हजार रुपये, श्रावणी सुरेश बनसोडे 5 हजार रुपये, आर्यन नवनाथ वरे 5 हजार रुपयांची आर्थिक मदत व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे कायदेतज्ञ अॅड. सचिन वाघ, अॅड. शुभम निंबाळकर, अॅड. अमरसिंह मारकड आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवले आहे. त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशानी ही बक्षिसे दिली असल्याचे प्रा. डॉ. सागर आटोळे यांनी सांगितले.

