
दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 च्या जयंती वर्षानिमित्त सातारा व मायणी, ता. खटाव या ठिकाणी 100 खाटांचे मुलींचे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सदर वसतिगृहासाठी शासकीय इमारत उपलब्ध नाहीत, परंतु सदरची वसतिगृहे तात्काळ सुरु करावयाची असल्याने खाजगी इमारत स्वयंपाक खोली, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, पुरेशा प्रमाणात पाणी व वीज इ. सुविधा असलेल्या इमारती आवश्यक आहेत. या करिता इच्छूक खाजगी इमारत मालकांनी इमारत भाड्याने देण्याकामी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003. फोन नं. 02162-298106 या पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.