स्थैर्य, खटाव, (डॉ विनोद खाडे) दि. २१ : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होवून १५ दिवस लोटले असले तरी काही कारणास्तव उशिरा का होईना खटाव चे नूतन तहसीलदार किरण जमदाडे अखेर हजर झाले आहेत.मंगळवारी परंपरेनुसार जमदाडे यांचं कर्मचारी वर्गांकडून स्वागत करण्यात आलं.सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावचे सुपुत्र किरण जमदाडे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे संजय गांधी निराधार योजना तसेच कोरोना नियंत्रण कक्ष या ठिकाणी काम केले आहे. २०१७/१८ मध्ये करमाळा येथे नायब तहसिलदार म्हणून केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल पुणे विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते जमदाडे यांना गौरविण्यात आले होते.सोलापूर येथे संजय गांधी निराधार योजनेत काम करीत असताना अपात्र व बोगस लाभार्थी नोंदीतून तब्बल 20 हजार बोगस लाभार्थी शोधून काढले आहेत.
बार्शी येथे तहसीलदार म्हणून दोन महिने काम केले असून खटाव तालुका तहसीलदार पदी ते प्रमोशन ने रुजू झाले आहेत.फक्त पाच मिनिटांत मुलाखत पूर्ण झाली.
“कामाचा पहिला दिवस असल्याने मला तुमच्या सोबत बोलायला एवढा वेळ मिळाला,नाही तर मला बोलायला वेळ सुद्धा नसतो,कारण मी लोक हिताला प्राधान्य देतो.”-किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव