साताऱ्याला जोरदार पावसाचा तडाखा; महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अंतिम सामने स्थगित : बाळासाहेब लांडगे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०९ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरी टप्प्यात आलेल्या असताना शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने त्यावर पाणी फिरले आहे त्यामुळे पुढील सामने पुढील सूचना येईपर्यंत स्थगित झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांनी दिली आहे.

पावसाच्या दरम्यान क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या विद्युत दिव्यांची कमान कोसळल्याने नुकसान झाले आहे. शुक्रवारी सातारा जिल्ह्यात माण खटाव कराड सातारा वाई या तालुक्यांना अवकाळी पावसाने सुमारे दीड तास झोडपून काढले. या पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बसला शुक्रवारी माती आणि गादी गटातील 97 आणि खुल्या गटातील कुस्त्यांच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होणार होते शनिवारी दिनांक 9 रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत होऊन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाच्या गदेचे वितरण करण्यात येणार होते. शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा सुद्धा निश्चित झाला होता मात्र जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या एकुण वेळापत्रक कार्यक्रमावर पाणी पडले.

सातारा शहर आणि जिल्हा मध्ये सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. जिल्ह्याच्या पूर्व भागात गारांसह आणि जोरदार वाऱ्यांचा मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे जिल्हा क्रीडा संकुल या मधील मातीची आणि गादीचे आखाडे काही खराब झाल्याचे संयोजकांनी सांगितले. मात्र या आखाड्याची पावसापासून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था ताडपत्री टाकून करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे क्रीडा संकुलातील हॅलोजन दिव्यांची कमान एका बाजूने जोरदार वार्‍याने कोसळल्यामुळे काही नुकसान झाल्याचे संयोजकांनी कळवले आहे. क्रीडा संकुलातील महत्त्वाचे ध्वनिक्षेपक त्याचबरोबर डिजिटल गुणफलक हे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली आहे. एकूण तीन गादी आणि दोन माती अशा पाच आखाड्याची रचना क्रीडा संकुलाच्या मध्यभागी करण्यात आली होती. त्यातल्या माती आखाड्याचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. मात्र क्रीडा शौकिनांची या पावसामुळे घोर निराशा झाली आहे. परगावाहून लढतीसाठी सातारा जिल्ह्यात मुक्काम दिलेल्या पैलवानांना कुस्त्यांच्या तारखांची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे कार्याध्यक्ष बापूसाहेब मोहिते यांनी साताऱ्यात तात्काळ जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून मोठे नुकसान झाले आहे काय याची माहिती घेतली तसेच या स्पर्धा पुढील सूचना येईपर्यंत काही काळाकरता स्थगित आल्याचे बाळासाहेब लांडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!