
स्थैर्य, सातारा, दि.२८: सातारा येथील जम्बो सेंटरमध्ये पगार थकला त्या कारणावरून सफाई कामगाराने ठेकेदाराच्या गाडीची काच तोडून त्याच दमदाटी केली या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की तक्रारदार आदिती सुनिल सनवे 34, रा. पाचगणी ता. महाबळेश्वर यांचा जम्बो कोविड सेंटर सातारा येथे वार्ड बॉय व हाऊस किपींगचे कामगार हॉस्पीटलला पुरविण्याचा ठेका असुन जम्बो कोविड सेंटरचे कंपाऊंडमध्ये त्यांचे व मुकादम ( एजंट ) धनंजय / प्रविण आहिरे यांचेशी कामगारांचे पगार देणेबाबत चर्चा चालु होती. त्यावेळी वॉर्ड बॉयचे काम करणारा कुलदिप सिद्धार्थ कांबळे याने माझा राहीलेला पगार द्या असे म्हणुन तक्रारदार यांचे पती सुनिल सनवे यांचे अंगावर थावुन गेला व तुम्हाला कोयत्याने तोडीन असे म्हणुन तक्रारदार व तक्रारदार यांचे पती यांना शिवीगाळ दमदाटी केली. तसेच तक्रारदार वापरत असलेली गाडी क्र MH09BB1746 फोर्ड फीयस्टा गाडीचे समोरील काचेवर मध्यभागी दगड मारून काचेचे अंदाजे 30,000 / रू चे नुकसान केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीवरून सदरची बाब ही नो.कॉ.रजि.नोंद करून तक्रारदार यांना सदरची तक्रार ही अदखलपात्र स्वरूपाची असलेबाबत सांगुन योग्य त्या कोटातुन दाद मागुन घेणेची समज दिली आहे.