स्थैर्य, फलटण, दि. ०३ : येथील अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याने दोघांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमधून दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन येथील एका अल्पवयीन मुलीबरोबर ओळख निर्माण करीत वडजल व सहारा लॉज, फलटण येथे दोघांनी अत्याचार केला असून या प्रकरणी संशयित आरोपी सुयोग गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही), रा. लक्ष्मीनगर फलटण याने २० नोव्हेंबर २०२० रोजी हॉटेल सहारा लॉज जिंती नाका फलटण येथे नेऊन अत्याचार केले. दरम्यान या घटनेची माहिती घेऊन जे त्याला दिले ते मला दे नाहीतर तुझ्या घरी सांगेन असे म्हणून तिसरा संशयित आरोपी महेश ननावरे रा. खुंटे रोड चौधरवाडी ता. फलटण याने वडजल येथील एका लॉजवर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केले.
दरम्यान संबंधित पिडीत मुलीला तिच्या घरून चारचाकी वाहनातून सुयोग गायकवाड याचा मित्र प्रीतम चोरमले,(पूर्ण नाव माहिती नाही) रा. फरांदवाडी ता. फलटण याने २० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पहाटे ३ वाजता घराबाहेर असलेल्या रोडवरून लॉज वरती नेले अशी फिर्याद पीडित मुलीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुयोग गायकवाड व महेश ननावरे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.