फलटणमध्ये हनी ट्रॅप करून १५ लाख ५० हजारांचीची खंडणी गोळा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २४ : दि. १५ मे २०२० रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याचा सुमारास फिर्यादी गाळ्यात बसलेला असताना अजित घोलप याने लक्ष्मीनगर येथील मानस प्लाझा बिल्डिंगमध्ये भेंडीचा व्यापारी आलेला आहे ते भेंडी घेणार आहे असे सांगून फिर्यादीस स्कुटी मोटार सायकलवर तेथे घेऊन आला. त्या वेळी तेथे एक मुलगी व राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर हे देखील बसलेले होते. त्यांनी फिर्यादीस मारहाण करून त्याचे कपडे काढून सदर मुलीच्या अंगावर ढकलून दिले व त्यांचे फोटो काढले. त्या नंतर गिरवीकडे जाणाऱ्या रोड वरील ओढ्यात अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी जबरदस्तीने पिवळ्या रंगाची मोपेड सायकल वर बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हे देखील मोपेड स्कुटी वरून त्या ठिकाणी आलेला होते. तेथे आल्यावर तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून आता त्या मुलीला तुझ्या विरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार द्यायला सांगतो अशी भीती दाखवून दमदाटी करून वीस लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी बदनामी होईल म्हणून पंधरा लाख ५० हजार रुपये त्यांना दिले. फिर्यादीस पोलीस प्रशासनाने सुरक्षेची ग्वाही दिल्यानंतर फिर्यादीने फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली. जर अशा प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर, सहाय्यक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ, एस. ए. तांबे, एन. डी. चतुरे, व्ही. एच. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप, यांनी केलेला आहे, असेही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!