दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । फलटण । महावितरणचे कर्मचारी अनिरूद्ध लिंबकर हे महावितरणच्या कार्यालयात शासकीय कामकाज करित असताना नंदकुमार हरिभाऊ कचरे, रा. धुळदेव, ता. फलटण यांनी माझ्या हॉटेलचे कनेक्शन तुम्ही पहिले जोडून द्या, तरच मी बिल भरतो असे म्हणत लिंबकर यांच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसुन लिंबकर यांना घरी जाण्यापासून प्रतिबंध केल्याने नंदकुमार हरिभाऊ कचरे यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.