दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आयएनएस विक्रांत या लढाऊ युद्ध नौका जेव्हा नौदलाची सेवा पूर्ण करून बाहेर पडली, त्यावेळेस तिला वाचवून तीच संग्रहालय करायचं , स्मारक करायचं असे सांगून सोमय्या याने देशातील नागरिकांना कडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा केला. सोमय्या यांनी देशभावनेचा अपमान केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली.
यावेळी चोर है चोर है किरीट सोमय्या चोर है, किरीट सोमय्याचं करायचं काय खली मुंडी वर पाय, अश्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी तालुका प्रमुख दत्ता नलावडे, विश्वनाथ धनावडे, अतीस ननावरे, अनिल गुजर, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, बाळासाहेब शिर्के, शहर संघटक प्रणव सावंत मंजिरी सावंत, रमेश बोराटे, अमोल गिरी गोसावी, गणेश शिंदे, श्रीकांत पवार,इम्रान बागवान, सयाजी शिंदे , नितीन लाकेरी, संतोष शिंदे, शाम लोटेकरं, शिवराम मोरे , छोटू देशमुख, रवी चीकने, श्री. चिकने, बेलोशे, सागर धोत्रे अक्षय जमदाडे, युवा सेना महेश शिर्के, जगताप, रवी भणगे, जितेंद्र बडेकार, राहुल गुजर ,विवेक जाधव, दादा पाटील शरद सावंत, स्वप्निल गायकवाड, शाहरुख शेख , आदी शिवसैनिक उपस्थित होते.