रामदेवबाबा विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करा : रामकिशन ओझा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 1 : ‘कोरोनील’ औषधाने कोरोना बरा होतो असा दावा करुन पतंजलीने मोठी प्रसिद्धीही केली. परंतु राजस्थान सरकार व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही पवित्रा पतंजलीने घेतला आहे.

कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली असली तरी कोरोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करुन जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण, डॉ. तोमर यांच्यासह  त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर ४२० चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे.

ओझा यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते असे म्हणतात की,

कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना आपण सर्वजण करत असताना काही लोक या संकटातही गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. पतंजली या आयुर्वैदिक औषध कंपनीनेही या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कोरोनील’ नावाचे औषध आणल्याचा दावा केला होता. परंतु या औषधाची कोठेही चाचणी केलेली नव्हती.

हा सर्व प्रकार जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारा असल्याने नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनमध्ये २४ जून २०२० रोजी रामदेवबाबा व त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी अर्ज दाखल केले आहे. परंतु आजपर्यंत FIR दाखल करण्यात आलेला नाही. पतंजलीने भूमिका बदलली असली तरी अशापद्धतीने जनतेची फसवणूक करणे हा एक गुन्हाच असल्यामुळे तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन रामदेवबाबावर गून्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला द्यावेत, असे ओझा म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!