स्थैर्य, फलटण, दि.२७: फलटण तालुक्यातील रावडी खुर्द येथील शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटूंबातील वाद फटाके वाजवन्या वरून विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसन मारामारीत झाल्याने दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी तक्रारी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रावडी खुर्द येथील रहिवासी प्रवीण गोरख करचे यांच्या फिर्यादी नुसार फिर्यादी प्रविण यांचा भाचा अक्षय खांडेकर हा घराचे अंगणात फटाके वाजवत असताना शेजारी राहणार सोमनाथ गुलाब राणे यास पाठिमागुन येऊन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच सोमनाथ यांचा मुलगा मच्छिंद्र यानेही अक्षयच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच रामदास गुलाब राणे व किरण सोमनाथ राणे हातातील कळकाने फिर्याद प्रविण यास मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या आई मालन गोरख करचे यांना हेमा मच्छिंद्र राणे, उमा किरण राणे, क्रांती सुनील राणे, अलका रामदास राणे , शारदा सोमनाथ राणे यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची फिर्याद प्रविण करचे यानी दाखल केली आहे तर शारदा सोमनाथ राणे यांनी गुरांच्या गोठ्याजवळ फटाके वाजवत असलेल्या अक्षय खांडेकर यास फिर्यादी शारदा यांचे पती सोमनाथ राणे याने फटाके वाजवल्याचा जाब विचारल्या बद्दलचा राग येवून अक्षय याने सोमनाथ राणे यांना मारहाण केली तसेच मालन गोरख करचे, प्रविण गोरख करचे ,दिपक गोरख करचे,प्रशांत लोणारे हे आले असता प्रविण करचे याने हातातील काठीने सोमनाथ राणे यास पाठीत मारहाण केली तसेच फिर्यादीची सुन हिचा विनयभंग केल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.
..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!