दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । सांडपाणी आमच्या दारात येत आहे, म्हटल्याच्या कारणावरून शहनाज सिकंदर सय्यद (वय48,रा.शनिवार पेठ, सातारा) यांना व त्यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नइमपालकर, मुक्तार पालकर, शाहरूख पालकर, असरादपालकर, अब्राहीम पालकर (सर्व. रा. शनिवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. यातील संशयित नईम पालकर याच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या कट्याची वीट काढल्याने सांडपाणी शहनाज सय्यद यांच्या अंगणात येते होते. त्यामुळे त्यांनी पालकर यांना कटटयाची वीट का काढली. त्यामुळे सांडपाणी आमच्या दारात येत आहे. तसेच घाण वास येत आहे. असे म्हणाले. यावरून संशयितांनी शहनाज सय्यद यांना व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही मारहाण केली.