शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि.१८: तालुक्यातील शिवथर येथे शेतातून येण्या-जाण्याच्या कारणावरुन झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावरून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत सुभाष साबळे (वय ३१, रा. शिवथर, ता. सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवथर येथील अंबवळी शिवारात गेलो होतो.  शेतातील सरबांधावरुन जात असताना रमेश  साबळे, सुधीर  साबळे, प्रदीप साबळे, राजेंद्र  साबळे, जीवन साबळे, चेतन साबळे (सर्व रा. शिवथर, ता. सातारा) यांनी अडवत ‘तू सरबांधावरुन जायचा संबंध नाही आणि तू येथून जायचे नाही,’ असे बजावले. यावरून  भांडणे सुरु झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी या सहाजणांनी  धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. हा प्रकार सुरु असतानाच रमेश साबळे याने माझ्या डोक्यात दगड फेकून मारला.
 अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.
दरम्यान, उर्मिला रमेश साबळे (वय ३५, रा शिवथर) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवथर येथील अंबवळी शिवारात शिवथर ते मालगावकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर त्यांचे पती रमेश दत्तात्रय साबळे यांना जागेतून येण्याजाण्यावरुन प्रशांत साबळे, सुरज  साबळे, तेजस साबळे, शुभम साबळे, प्रज्वळ  साबळे, निवास ( सर्व रा. शिवथर) यांनी शिवीगाळ, दमदाटी करुन धक्काबुक्की केली. यावेळी रमेश यांना प्रशांतने लाकडी काठीने मारहाण केली. यात त्यांना मुका मार लागला आहे. याचवेळी ही भांडणे सोडविण्यास उर्मिला यांचे दीर प्रदीप साबळे, पुतण्या राजेंद्र  साबळे आणि चेतन साबळे आले असता त्यांनाही धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी केली.
  याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार बागवान हे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!