पतंग उडविण्यावरुन दोन कुटूंबात हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : लहान मुलांच्या पतंग उडविण्यावरुन दोन कुटूंबात हाणामारी झाल्याचा प्रकार शहरातील जिंती नाका येथील गोसावी वस्तीत घडला असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

या शहर पोलीस ठाण्यात नंदराज शाम पवार वय 32 राहणार जिंती नाका गोसावी वस्ती. मलटण फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पवार यांच्या घरासमोर त्यांच्या घरातील लहान मुले पतंग उडवत असताना काही मुले मांज्याला दगड बांधून वरती टाकून उडती पतंग खाली घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पतंग उडवणार्या मुलांनी त्यांना तुम्ही तसे का करता असे विचारले म्हणून हनुमंत पोपट जाधव याने दगड व लाकडी दांड्याने, मनोज आत्माराम जाधव याने लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी  निहाल मनोज जाधव याने लाकडी दांडक्याने व साक्षीदार सरोज हिच्या पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण करून नाकावर फाईट मारली तसेच धनंजय आत्माराम जाधव याने सरोज हिच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. याबाबत अधिक तपास सपोनि भीसे हे करीत आहेत.

दरम्यान अनिल आत्माराम जाधव वय ३५ राहणार जिंती नाका गोसावी वस्ती मलटण फलटण  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोसावी वस्ती रोडवर त्यांचा पुतण्या निहाल मनोज जाधव यास लाकडी दांडक्याने मारत असताना आपण मुलाला कशाला मारताय असे म्हणाल्याचे कारणावरून आरोपी सुनंदा श्याम पवार हिने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागे मारून जखमी केले संदीप श्याम पवार यांनी त्यांचे आईला कानाखाली हाताने चापट मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादी उठत असताना वीट फेकून मारली. नंदा शाम पवार व श्याम पवार व त्यांचे जावई हेही मारण्यासाठी अंगावर धावून आले व म्हणाले की तू इथे कशाला आला आहेस असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास पो. ह. काकडे हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!