दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२१ । फलटण । राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडणूक लढवताना व कामकाज करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सामावून घेत नाही. तरी फलटण तालुक्यात आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी मागणी फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांच्याकडे केली.
प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांनी फलटण तालुक्यामध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद गटनिहाय व नगरपरिषद प्रभाग निहाय असणार्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केलेली होती. त्या वेळी कणसे बोलत होत. या बैठकीस जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विश्वंभर बाबर, प्रांतिक प्रतिनिधी सचिन सुर्यवंशी – बेडके, तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी – बेडके, शहर काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार, कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे,फलटण तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, शहर उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रितम जगदाळे, फलटण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अजिंक्य कदम, फलटण तालुका युवक उपाध्यक्ष नवनाथ लोखंडे, फलटण तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे, शहर काँग्रेसचे खजिनदार बालमुकुंद भट्टड, लक्ष्मण बेंद्रे, बालमभाई शेख, मनोहर गायकवाड, सोपानराव जाधव, अभिजित जगताप तसेच विविध सेलचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.