दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । खंडाळा । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अकरा लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हातोहात लांबवल्याची घटना उघड झाली आहे खंडाळा पोलिसांपुढे ही जबरी चोरी उघडकीस आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे फलटण उपविभागाचे उपाध्यक्ष तानाजी बर्डे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे.
जितेंद्र बबन भणगे व 41 राहणार पारगाव खंडाळा यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते 18 जुलै रोजी सकाळी 11 या दरम्यान काही कामानिमित्त भणगे बाहेर गेले होते घरी परतल्यानंतर त्यांच्याकडे चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
पोलीस सूत्रांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार 50 हजार रुपये किमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस 62 हजार पाचशे रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची दोन पदरी मोहन माळ, 37 हजार पाचशे रुपयांचा दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या वाट्या, 87 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची चैन व पट्टी 62 हजार पाचशे रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन, 25 हजार रुपये किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस पन्नास हजार रुपये किमती सहा तोळे वजनाचे बारीक डिझाईन असलेले गंठण, सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाचा लक्ष्मीचा फोटो, सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळा वजनाचे अर्धे सोन्याचे बिस्किट अडीच तोळ्या वजनाची 87 हजार पाचशे रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या ,पंधरा हजार रुपये किमतीचे पैंजण जोडवी मनगट या वाळ्या इतर चांदीचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख असा 11 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
खंडाळा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून उपाधीक्षक तानाजी बर्डे यांनी घटनास्थळाला भेट दिली पारगाव खंडाळा सारख्या महामार्ग लगतच्या वरदळीच्या भागांमध्ये झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खंडाळा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासामध्ये दोन पथके तयार केले असून संबंधितांचा शोध कसून घेतला जात आहे पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे अधिक तपास करत आहेत.