
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । भारतातील बहुप्रतिक्षित सणासुदीचा काळ जवळ आला आहे जेथे लोक त्यांच्या प्रियजनांसोबत सणाचा आनंद घेण्यासोबत एकमेकांना गिफ्ट्स देतात. या उत्सवी मोसमाकरिता द बॉडी शॉप या ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डची व्यापक पर्सनल केअर उत्पादन श्रेणी उत्साहपूर्ण फेस्टिव्ह गिफ्ट्सनी युक्त आहे.
द बॉडी शॉप बेरी ड्युओ गिफ्ट सेट: आंघोळीची वेळ कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना दिवसात मिळणारा एकमेव ‘मी टाइम’ आहे, जेथे आपण आरामदायी विरंगुळ्याचा आनंद घेऊ शकतो. शॉवर/टबमध्ये एखाद्याचा वेळ अधिक आनंददायी बनवण्यासाठी द बॉडी शॉपचा सोक अॅण्ड स्लेदर बेरी बाथ सेट एक उत्तम गिफ्ट आहे. हे गिफ्ट वापरकर्त्याला आत्म-प्रेम देण्यासोबत ब्रॅण्डचे निसर्गावरील प्रेम देखील व्यक्त करते. याशिवाय, प्रत्येक वैयक्तिक उत्पादनासह संपूर्ण गिफ्ट सेटचे पॅकेजिंग एफएससी प्रमाणित आहे आणि ते मोठ्या प्रमाणात पुनर्वापर केले जाऊ शकते. यात २०० मिली स्ट्रॉबेरी बॉडी योगर्ट, २५० मिली बेरी बाथ ब्लेण्ड आणि बाथ अॅक्सेसरी यांचा समावेश आहे.
द बॉडी शॉप ब्रिटीश रोझ ब्युटी बॅग: रिफ्रेशिंग पर्सनल केअरची गरज असलेल्यांसाठी द बॉडी शॉपचे ब्रिटीश रोझ ब्युटी बॅग परिपूर्ण गिफ्ट आहे. लॅदर अॅण्ड स्लॅदर ब्रिटीश रोझ गिफ्ट बॅगेच्या सामग्रीमध्ये ब्रिटनच्या सर्वोत्तम गुलाबांचा चांगुलपणा समाविष्ट आहे आणि पायापासून तळाव्यापर्यंत केअर घेणाऱ्या घटकांचे पॅकेज आहेत. बॉडी बटर टब देखील कम्युनिटी फेअर ट्रेड, भारतातील बेंगळुरूच्या रस्त्यांवरून गोळा केलेल्या पुनर्चक्रणीय प्लास्टिकसह १००टक्के पुनर्चक्रण केलेल्या प्लास्टिकमध्ये बनवण्यात आले आहे. त्यांचा सहयोग कचरा गोळा करणाऱ्यांना योग्य किंमत आणि सुधारित कामाची स्थिती मिळण्यास मदत करतो. ही गिफ्ट बॅग वाइप करता येईल अशा एफएससी पेपरसह तयार करण्यात आली आहे आणि पुन्हा वापरासाठी डिझाइन करण्यात आली आहे. यात ६० मिली शॉवर जेल, ५० मिली बॉडी बटर व ३० मिल हँड क्रीम, जी त्वचेला सर्वोत्तम हायड्रेशन व रिफ्रेशमेंट देईल.
द बॉडी शॉप ब्रिटीश रोझ डिलक्स गिफ्ट सेट: ब्रॅण्डच्या व्यापक ब्रिटीश रोझ श्रेणीमधील आणखी एक सर्वोत्तम डिलक्स गिफ्ट सेट व्यक्तीची त्वचा व भावनेला इंग्रजी भाषिक देशाप्रमाणे करेल. हा आलिशान, बो-रॅप गिफ्ट बॉस कोणत्याही प्रसंगासाठी परिपूर्ण आहे. हे पुनर्चक्रण केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आलेले पिंक बाथ लिली आहे आणि त्यामध्ये इंग्लिश गुलाबांचा सार समाविष्ट आहे. तसेच हे परिपूर्ण गिफ्टिंग कॉम्बो आहे. बॉक्स आकर्षक, बो-रॅपसह येतो. बॉक्समध्ये पुनर्चक्रण केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आलेले पिंक बाथ लिली असण्यासोबत इंग्लिश गुलाबांचा सार समाविष्ट आहे. हे कॉम्बो पॅक २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी बटर, ३० मिली हँड क्रीम आणि १०० मिली ओ दे टॉइलेटसह येते.
द बॉडी शॉप मेन्स शेव्हिंग किट: क्लीन-शेव्ह लुक पसंत असलेल्या पुरूषांसाठी द बॉडी शॉप मेन्स स्मूद अॅण्ड सूथ शेव्हिंग किट तुम्ही देऊ शकता असे सर्वोत्तम गिफ्ट आहे. मका रूट व अॅलो वेराचा चांगुलपणा असलेले स्टबल-सूथिंग उत्पादने कूलिंग व रिफ्रेशिंग शेव्हिंग व आफ्टर-शेव्ह अनुभव देतील. उत्पादनांमधील अॅलो वेरा मेक्सिकोमधील ब्रॅण्डच्या कम्युनिटी फेअर ट्रेड सहयोगींकडून मिळवण्यात आला आहे. यात १५० मिली मका रूट अॅण्ड अॅलो वेरा शेव्हिंग जेल आणि १६० मिली मका रूट अॅण्ड अलो वेरा पोस्ट-शेव्ह जेल यांचा समावेश आहे.