मानवी रक्षा व भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खत निर्मिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


हा देशात पहिलाच प्रयोग असावा असा दावा

स्थैर्य, सातारा, दि. 02 : सातारा शहरात असलेल्या तीन भाजी मंडईत दररोज कचरा तयार होतो. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱयापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी सातारा पालिकेने युनियन भाजी मंडईत पाठीमागे पीठ तयार केले आहेत. येथील खत निर्मितीचे काम हे सर्व श्रमिक कचरा वेचक संघाच्यावतीने केले जाते. त्यांना नेहमीच प्रयोगशील पर्यावरणप्रेमी विजय निंबाळकर यांचे मार्गदर्शन राहिले आहे. आता नव्याने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या सहकार्याने मानवी रक्षा-भाजीपाल्याचा कचरा यातून खत निर्मिती केली जात आहे. कैलास स्मशानभूमीचे एक पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीने टाकण्यात यश आले आहे. तयार झाले खत हे झाडांना चांगलेच उपयोगी ठरत आहे. हा प्रयोग देशात पहिलाच असावा असा दावा सर्व श्रमिक कचरा वेचक संघाचे अध्यक्ष शशिकांत भिसे यांनी केला आहे.

पर्यावरणाचा वाढता ऱ्हास होत असलेले पाहून शहरात दररोज तयार होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती व्हावी याकरता सातारा पालिकेने 2017 मध्ये आठ पीट तयार केले आहेत. युनियन भाजी मंडई आणि महात्मा फुले भाजी मंडईत असे पीट आहेत. त्यापैकी युनियन भाजी मंडई येथे सेंद्रीय खत निर्मिती केली जात आहे. ही खत निर्मिती करताना सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये जो भाजीपाल्याचा ओला कचरा आहे. त्या कचऱ्यातून सेंद्रीय खत तयार केले जात आहे. आता त्यातच कैलास स्मशानभूमीतल्या मानवी रक्षेचा वापर केला जावू लागला आहे. या रक्षेमुळे चांगल्या प्रतिचे खत तयार होत आहे. तयार झालेले खत हे नजिकच श्रमिक कचरा वेचक संघाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या बागेतल्या झाडांना वापरले जाते. हा खत प्रकल्प देशात पहिलाच असावा, असा दावा सर्व श्रमिक संघाच्यावतीने केला आहे. यासाठी पर्यावरणप्रेमी विजय निंबाळकर यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे.

सेंद्रीय खत प्रकल्प 2017 पासून सुरु केला आहे. आतापर्यंत भाजीपाल्याच्या कचऱ्याला सुकवण्यासाठी मातीचा वापर करत होतो. आता रक्षेचा वापर करत आहोत. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱ्यातून रक्षा पाणी खेचते. भाजीपाल्याचा कचरा लवकर सुकतो. लवकर खत तयार होते. रक्षा आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून  चांगल्या प्रकारचे खत तयार होते…शशिकांत भिसे सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष

प्रदुषण टाळले जाते..सर्व श्रमिक कचरा वेचक संघ जेथे खत निर्मिती करतात. त्या केंद्राला रक्षा मोफत दिली जाते. यातून समाजकार्य करा, आम्हाला आऊटपूट काही नको, अशी आम्ही विनंती केली आहे. खत निर्माण करुन झाडांना देतात. एक वेगळाच प्रयोग आहे. शेण्या वापरुन आपण झाड वाचवली. रक्षा पाण्यात न टाकता प्रदूषण टाळले. एकमेव कैलास स्मशानभूमी आपल्याला पहायला मिळेल…राजेंद्र चोरगे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!