दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी येथे फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
येथील उर्दू शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. त्यांच्याविषयी शाळेतील शाळेचे मुख्याध्यापिका यांनी माहिती दिली व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी फातिमा शेख, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे वस्त्र परिधान केले होते. या कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इमरान भाई कुरेशी, माजी नगरसेवक जाकीर भाई मनेर, अमीर शेख, पप्पू शेख, मेहबूब मेटकरी, जमशेदभाई पठाण, बबलू मोमीन, अबीद खान, जावेद शेख, रज्जाक बागवान, वसीम मनेर, आसिफ शेख शाळेच्या मुख्याध्यापिका तांबोळी, रफिक शेख व सर्व स्टाफ उपस्थित होता.