
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । म्हसवड । म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील सातारा पंढरपुर फोर लेनच्या हायवे रोडवरील चार किलो मिटर अंतरावर शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास लोखंडे पाटीजवळील विठ्ठल मंदिराचे नजीक सोलापूर जिल्ह्यातील बेंबळा या गावातील बापलेक आपल्या मोटारसायकलींवरुन म्हसवडकडे येत असताना पाठीमागून सोलापूरच्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाने बापलेकांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बापलेक दोघे ही जखमी झाले दोघांना उपचारासाठी नेहत असताना मयत झाले तर धडक दिलेले अज्ञात वाहन मोटारसायकल धडक देवून जख्मीना उपचारासाठी दवाखान्यात व पोलीस ठाण्यात खबर न देता अपघातात कारणीभूत ठरल्या प्रकरणी फरारी झालेल्या अज्ञात वाहनावर आज शनिवारी दुपारी अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आसुन त्या अज्ञात वाहनाचा तपास लावणे म्हसवड पोलिसांसमोर एक आव्हानच आसुन म्हसवड पोलीस या रोडवरील सी सी टी व्ही फुटेज तपासणी सुरू आसुन लवकरच आरोपी गजाआड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती या प्रमाणे काल शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळा गावातील रहिवासी व सध्या पूणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी हणमंत धर्मा उकिर्डे वय ५५ व त्यांचा मुलगा बाबासाहेब हणमंत उकिर्डे वय ३५ हा हि वडिलांच्या जागेवर पूणे महानगरपालिकेतील कामाला होते दोन दिवसा पूर्वी ते दोघे हि सोलापूर जिल्ह्यातील बेंबळा या आपल्या गावी आले होते तेथील काम करुन बापलेक आपल्या स्प्लेंडर प्लस या गाडी नंबर MH 12 GS 7488 मोटार सायकल वरुन पूणे येथे काल शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान निघाले होते दोघे हि बापलेक सांयकाळी म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले असताना ७.३० च्या दरम्यान म्हसवड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवड हद्दीतील लोखंडे वस्ती या ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरा नजिक उकिर्डे बापलेकांच्या मोटारसायकलला पाठिमागून येवून जोराची धडक देवून सदर चार चाकी वाहन अपघात स्थळी न थांबता निघुन गेल्याने दोन्ही जख्मी बापलेक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते या अपघाताची माहिती या वस्तीवरील लोकांनी पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी अॅम्बुलन्सने दोघा बापलेकांना उपचारासाठी म्हसवड येथील खाजगी हाॅस्पिटल येथे घेऊन जात असताना दोघांचा हि मृत्यू झाला त्या दोघांच्या खिशातील ओळख पत्रावरून त्याची नावे व फोन नंबरवरुन त्यांच्या नातेवाईकांसी संपर्क केल्या नंतर आज शनिवारी पहाटे नातेवाईक म्हसवड येथे येवून सुनिल दगडु भिसे वय 55वर्षे धंदा शेती रा. उजनी ता. माढा जि. सोलापुर यांनी अज्ञात चार चाकी वाहनचालकांच्या विरोधात आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात हयगईने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हणमंत धर्मा उकिर्डे वय 55वर्षे व बाबासाहेब हणमंत उकिर्डे वय 35वर्षे दोन्ही रा. बेंबळे ता. माढा जि. सोलापुर यांचे गाडीस पाठिमागुन ठोकर देवुन अपघात करुन अपघाताची खबर पोलिस ठाण्यात न देता व जखमीनां उपचारा करता दाखल न करिता पळुन गेला म्हणून त्या अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात बापलेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आसुन रात्री झालेला हा भिषण अपघात त्या मध्ये दोघे बापलेकांना ठोकरुन निर्दयीपणे निघून गेलेला त्या वाहनाचा शोध घेणे म्हसवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आसुन या अपघात स्थळापासून तिन किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाचा सीसीटीव्ही फुटेज त्या नंतर चांदणी चौक, शाळा डॉ आंबेडकर चौक, शिंगणापूर चौक व तिन पंप एक गॅस एजन्सी, ढाबे असे सर्व फुटेज तपासून म्हसवड पोलीस त्या अज्ञात वाहनाच्या चालकाचा तपास लावणार का?
हणमंत उकिर्डे हे पुणे महानगरपालिका येथे कामाला होते त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपला एकुलता एक मुलगा बाबासाहेब उकिर्डे यास कामावर लावले होते बाबासाहेब यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते मात्र त्यांना मुले नव्हती एक विवाह बहिण आई वडील असे पाच जगाचे कुटुंब होते बापलेकांच्या अकस्मात जाण्याने सासू सुनेवर दुधाचा डोंगर कोसळला आसुन शनिवारी रात्री उशीरा पूणे येथे त्या बापलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.